नववर्षाचा पहिला दिवस पुण्यातल्या Abhinav Kala Mahavidyalaya आणि मुंबईतल्या Sir J.J. School of Art मधिल माझा वर्ग मित्र असलेल्या केदार नामदास याच्या सोबत त्याच्या पुणे येथील स्टुडीओत घालविण्याचा योग आला.
गेल्या आठ वर्षांच्या कला प्रवासात केदारच्या कल्पकतेत, विचार प्रक्रियेत आणि एकुनच विषय हाताळण्याच्या पद्धतीने गाठलेली उंची त्याच्या चित्रांच्या विषयांप्रमाणेच बोल्ड आहे; विश्वस्तरीय मानवी समाजाच्या बेगडी मुखवट्यांच्या चिंध्या-चिंध्या करणारी आहे; त्याच्या चित्रांतील बारकावे, विषयाचा ठळकपणा आणि नाजुक रेषांमधुन नजरेसमोर अलगद उभ्या राहणाऱ्या विषयाची भेदकता पाहताच क्षणी मन आणि चित्त स्तब्ध करून जाणारी आहे.
Artist from Pune |
केदारच्या आगामी सर्व कलाकृतींसाठी नववर्षाचे निमित्त साधुन शुभेच्छा आणि शुभचिंतन!