मुर्खांचा सावळा गोंधळ

तसं सर्वच व्यवस्थीत आणि नियमीत सुरू आहे..
जगणे काय या पलिकडे आपली झेप घेण्याची आघोरी चढाओढ एक सुढृड समाज घडवतेय.. आपण काय करतोय याचा विचार करण्याचा रीकामटा वेळ आपल्याकडे नाही.. विचाय परिपक्व होत आहेत(इतके की सडक्या आंब्या प्रमाणे गळून पडताहेत, ठीकठीकाणी)
हे सर्वच विदारक आहे असे म्हंटल्यास मी कळपातून वेगळा झालेलो दिसेल काहीकाळ.. नंतर मी देखील नकळत सामील होणार याच शर्यतीत हे नक्की.. कारण
आपल्यात ती धमक नाही, आपण आपला सोशिक आणि वेंधळेपणा केव्हाच सिध्द केलेला आहे..
त्या मुळे आपल्याला काय अधिकार सरकारला जाब विचारण्याचा..
-वाहतुकीचे नियम न-पाळणारे आपण..
-भर रस्त्यात थुंकणारे आपण..
-रितसर तीकीट काढुनही लोकल मध्ये जागा न-मीळाल्यास आपल्याच सहकार्‍यांसोबत भांडणारे आपण..
-भविष्य आणि भवितव्य याची सांगड न घालता निमुटपणे लोकसंख्या वाढवणारे आपण..
-निसर्गाची अवहेलना करता, झाडांची स्व-अर्थासाठी खुलेआम कत्तल करणारे आपण..
-सुंदर आणि वैचारिक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत, अमराठी चित्रपटांतील अश्लिल राहणीमाणाची नक्कल करण्यात मग्न आपण..
..आणि प्रेम, माया, ममता, बंधुता ईतुकेच काय तर अगदि स्व:ला मुकलेलो आपण, या निर्लज्ज पणाचे महानाट्य साकारणार्‍या सरकाराच्या कारभारास सातत्याने पुरस्कृत करणारे आपण.. आपण आपला काय अधिकार एक शब्द ही उच्चारण्याचा ..


Leave a Reply

comments-bottom

Featured Photos

kid Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response
hindu Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | no responses
footprints Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response

Random Photos

celebration Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response
trust Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | no responses
Harshad Khandare Posted by author icon Harshad Jul 22nd, 2010 | 4 responses

Top Rated

प्रवाह Posted by author icon Harshad
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (4 votes - 5.00 / 5)
आयुष्य Posted by author icon Harshad
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (1 votes - 5.00 / 5)
अंतःरीतून... Posted by author icon Harshad
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (1 votes - 5.00 / 5)